Share

डीजीसीएची परवानगी नसताना सिंधुदुर्गमध्ये विमान कसं उतरवण्यात आलं? : नारायण राणे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. आज त्यानुसार 12 आसनी विमान बाप्पांसोबत उतरविण्यात आले. हे विमान चेन्नईहून आले होते. मात्र, यावरून सिंधुदुर्गात राजकीय वाद सुरु झाले आहेत. विमानतळासाठी डीजीसीएची परवानगी नसतानाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी चिपी विमानतळावर विमान उतरवल्याचा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

सिंधुदूर्गातील चिपी विमानतळावर चेन्नईहून उड्डाण केलेलं विमान सकाळी उतरलं होतं. चेन्नईवरुन उड्डाण केलेलं विमान गोवा एअर क्लिअरन्स मिळाल्यानंतर चिपी विमानतळावर लँड झालं. या १२ आसनी विमानातून गणपती बाप्पाचं आगमन झालं. चाचणीसाठी हे विमान उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, डीजीसीएची परवानगी नसताना हे विमान कसं उतरवण्यात आलं, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!