Share

बंगालमध्ये सीबीआयकडून नारदा घोटाळा प्रकरणी मंत्री,आमदारांना अटक; राजकीय वातावरण तापले

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल लागून ममतांचे सरकार येऊन अवघे काही दिवस झाले आणि पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात तृणमूल काँग्रेसने सत्ता स्थापन केली, मात्र त्यांच्या सरकार समोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

आज नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने आज टीएमसीच्या मंत्री आणि आमदारांच्या घरी छापेमारी केली. त्यानंतर  दोन मंत्र्यासह आणखी दोन नेत्यांना  अशा चौघा जणांना अटक केली. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातील फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी यांना नारदा घोटाळ्यात सीबीआयने अटक केली आहे. यावरून बंगालमध्ये राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे.

आज सकाळीच या प्रकरणात तृणमूल काॅंग्रेसचे दोन मंत्री, एक आमदार आणि माजी मंत्री शोभन चटर्जी यांना सीबीआयच्या कार्यालयात नेण्यात आले होते. यापूर्वी राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी सीबीआयला फिरहाद हाकिम यांच्यासहीत सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्या विरोधातील कारवाईला मंजूरी दिली होती.

नारदा स्टिंग ऑपरेशनमधील घोटाळा हा 2016 च्या विधानसभा निवडणुकीवेळचा आहे. निवडणुकी आधी नारदा स्टिंग टेप प्रसारीत करण्यात आली होती. यामध्ये तृणमूलचे मंत्री, खासदार आणि आमदार हे खोट्या कंपनीच्या लोकांकडून पैसे घेत असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

हे स्टिंग ऑपरेशन 2014 मध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. कोलकाता उच्च न्यायालयाने 2017मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये या चार नेत्यांचीच नावे नव्हती, तर भाजपमध्ये सामिल झालेल्या अनेक नेत्यांचीही नावे होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!