पुणे : “निरोप घेतो देवा आज्ञा असावी, काही चुकले माकले असेल तर क्षमा द्यावी” , अशीच भावना आज प्रत्येक गणेशभक्तांच्याच्या मनी असेल. यंदा या कोरोना रोगाच्या सावटामुळे विघ्नहर्त्याचे आगमन अत्यंत साधेपणाने झाले. ना भव्य मंडप, ना देखावे, ना मिरवणुक, ना ढोल-ताशांचा गजर अशा साधेपणाने बाप्पा विराजमान झाले होते.
आज, अनंत चतुर्दशी! बाप्पाला निरोप देण्याचा दिवस बघता बघता उभा ठाकला आणि गेले ५ महिने कोरोनाच्या कहराच्या दहशती खाली जात असताना गणेशोत्सवाच्या काळात मात्र काहीसं वातावरण बदलून गेलं होत. संस्कृतीचा वारसा लाभलेल्या पुण्यासह राज्यभरात भव्य-दिव्य मिरावणुकींनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो, ती भव्यता जरी यंदा नसली तरी भक्तिभावात मात्र कोणतीही कमी नाही.
अबाल-वृद्ध सर्वच या कोरोनाचे विघ्न दूर कर अशीच प्रार्थना करत विघ्नहर्त्याला निरोप देत आहेत. पुण्यातील मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन देखील मंदिर परिसरातच विसर्जन हौदात करण्यात येणार असून काल संध्याकाळीपासुनच पुण्यातील शनिवार वाडा ते मंडई रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नागरिक लांबूनच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी गर्दी न करता सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासन व मंडळांकडून केले जात आहे.
भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या जाण्याने एका युगाची समाप्ती


