🕒 1 min read
मुंबई : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, जूनपासुन देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत ‘मिशन बिगीन अगेन’ ची घोषणा केली होती.
आता, जनजीवन पूर्वपदावर येत असताना अनेक सामान्य लोकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक फटका सहन करत खाजगी वाहनाने प्रवास करण्यासाठी ई-पासचे बंधन पाळावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यांतर्गत आणि इतर राज्यांमध्ये जायचे असल्यास ई-पास वा तत्सम परवान्याची गरज नसून प्रवासावरील बंदी उठवण्याची केंद्र सरकारने तयारी दर्शवत निर्णय राज्य सरकारकडे सोपवला होता.
भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या जाण्याने एका युगाची समाप्ती
गेले काही दिवस, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारने ई-पास बंदी बाबत निर्णय घेतला नसल्याने भाजपा व मनसेकडून राज्य सरकारवर टीका केली जात होत. आता मात्र, राज्य सरकारतर्फे नागरिकांना खुशखबर देण्यात आली असून अनलॉक ४ अंतर्गत ई-पास पूर्णतः बंद करण्यात आला आहे. उद्या दिनांक १ सप्टेंबरपासून राज्यात मालवाहतूक वा खाजगी वाहनाने प्रवास करण्यासाठी आता ई-पासचे बंधन हटवण्यात आले आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

