Share

भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या जाण्याने एका युगाची समाप्ती

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची काही वेळापूर्वीच प्राणज्योत मालवली. देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे. ते ८४ वर्षांचे होते. मागील वर्षी त्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्नने गौरवण्यात आले होते.

प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून २५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७ पर्यंत काम पहिले. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी काम केले आहे. राष्ट्रपती पदापुर्वी त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याने आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, ‘ असाधारण विवेक असलेले, भारतरत्न मुखर्जी यांचे व्यक्तिमत्व हे परंपरा आणि आधुनिकतेचे संगम होते. ५ दशकांच्या गौरवशाली सार्वजनिक जीवनात अनेक मोठ्या पदांवर राहून देखील ते सदैव भूमीशी जोडले गेले होते. आपल्या शांत आणि मनमिळावू स्वभावाने ते राजकीय क्षेत्रात सर्वप्रिय होते.”

राज्यात धार्मिकस्थळं लवकरच सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले : प्रकाश आंबेडकर

“भारताच्या प्रथम नागरिकाच्या रुपात त्यांनी राष्ट्रपती भवनसोबत लोकांची जवळीकता वाढवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे त्यांनी नागरिकांसाठी खुले केले. राष्ट्रपतींसाठी वापरण्यात येणाऱ्या महामहिम या शब्दाचा प्रयोग बंद करण्याचा त्यांचा ऐतिहासिक निर्णय होता”अशी भावना, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशियल ऑडिट होणे आवश्यक – आबा बागुल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!