औरंगाबाद : शहरात आज Covid-19 साठी घेतलेल्या दोन रुग्णांचा लाळेच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असून कोरोणाग्रस्त रुग्णांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली
व्हीओ..हॉटस्पॉट ठरलेल्या समातानगर येथील ४५ वर्षे वय असलेल्या महीलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता या भागात ६ रुग्णसंख्या झालेली आहे. रुग्णांनावर मिनी घाटीत उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांनांची संख्या ४० झाली असून त्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. १६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. १९ मिनी घाटीत दाखल असून ७ रुग्णांची १२ दिवसाची चाचणी निगेटिव्ह आलेली आहे दोन दिवसानंतर आणखी चाचणी घेण्यात येईल ती चाचणी निगेटिव्ह आली तर ते रुग्ण कोरोनामुक्त होतील आणि त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात येईल.
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल रात्रीतून दोन जण कोरोना पॉझिटिव आलेत. यामध्ये भीमनगर भागात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे तर समतानगर मध्ये राहणाऱ्या ड्रायव्हरच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना बाधित यांची संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. यातील 16 जन पूर्णपणे बरे झालेत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आलाय तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 19 रुग्ण कोरोणाचे उपचार घेत आहेत ही माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

