नांदेड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी उघड्यावर पडले आहेत. या आपत्तीत चार लाख ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. यात साडेपाच लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचे सांगण्यात आले होते.
परंतु, शासकीय यंत्रणांच्या प्राथमिक पाहणीत यात वाढ हाेऊन सध्या चार लाख ७३ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याने पाच लाख ८६ हजार २९९ शेतकरी बाधित झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पन्नास टक्के पंचनामे झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
जिल्ह्यात ऐन दिवाळीत परतीच्या मुसळधार पावसाने खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील चार लाख ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे पाच लाख ४३ हजार ५६३ शेतकरी बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यात सोयाबीनचे दोन लाख ४१ हजार हेक्टर, तर कपाशीचे एक लाख १७ हजार हेक्टरचे नुकसानझाले आहे.
जिल्ह्यात यंदा खरिपात पेरणी झालेल्या सात लाख ६३ हजार ८१२ हेक्टरपैकी चार लाख ७३ हजार ६५५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याने एकूण सात ९५ हजार आठशे खातेदार शेतकऱ्यांपैकी तब्बल चार लाख ८६ हजार २९९ शेतकरी बाधित झाले आहेत. यात सोयाबीनचे दोन लाख ७७ हजार २५८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर कपाशी एक लाख ४६ हजार २१४ हेक्टर, ज्वारी २३ हजार ११७ हेक्टर, तूर सात हजार ७५६ हेक्टर व इतर पिकांच्या १८ हजार ९०१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192365306754109440?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192365074360360960?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

