नांदेड : गणपती बाप्पा मोरया ….पुढच्या वर्षी लवकर या …च्या जयघोषात लाडक्या गणरायाला सात घालन गुरुवारी उत्साहात नांदेडकरांनी गणरायाला निरोप दिला गणेश भक्तांना श्री विसर्जनासाठी शहरात जागोजाग चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळपासूनच विविध गणेश मंडळाने ढोल ताशांच्या निनादात गुलालाची उधळण करत मिरवणुकी द्वारे पर्यावरणाचा संदेश दिला.
प्रसन्न आणि भक्तीमय वातावरणात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नांदेडकर सकाळपासूनच गल्लीबोळातून गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मिरवणुकीत सहभागी झालेले गणेश मंडळांनी मिरवणुकीत आकर्षक देखावे सादर केले. जुना मोंढा भागातील एकबाल गणेश मंडळाने लाडक्या गणरायाचे निरोपाने प्लास्टिक मुक्ती चा जिवंत देखावा सादर करून प्लास्टिक बंदीचा संदेश दिला. बाल गणेश मंडळाने सोयीनुसार कृत्रिम तलाव गोदावरी पात्रात निर्माण विसर्जित केले .मान्यताप्राप्त गणेश मंडळ आणि नियोजित वेळेत ढोल झांज लेझीम पथकांच्या समूहात मिरवणुका काढल्या.
शहरातील निवडक रस्त्यांच्या वाहतुकीत सकाळपासूनच बदल करण्यात आला होता. विविध मंडळांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नाव घाट नगीना घाट जुना पूल आदी ठिकाणी नदीपात्रात निर्माल्य विसर्जित केले. नदी पात्राचे पावित्र्य राखण्यासाठी समाजसेवक विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निर्माल्य गोळा करून मानवतेचा संदेश दिला. चोख पोलिस बंदोबस्तामुळे शहरात श्री विसर्जन मिरवणुकीत भाई साऱ्या सह शांतता कायम राहिली.
जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे नदीजोड प्रकल्पाला मंजुरी
महेंद्रसिंग धोनी निवृत्ती कधी घेणार; बीसीसीआयचे स्पष्टीकरण
पुतण्याचा काकाला इशारा; …तर कपडे फाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

