नांदेड : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामातील तीन लाख ९२ हजार हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी व कपाशीचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाज आहे. यात सर्वाधिक सोयाबीनची हानी झाल्याने जिल्हा प्रशासनाने कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणेसह विमा कंपनीला पिकांच्या नुकसाने पंचनामे करण्याचे आदेशीत केले आहे.
यामुळे यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर पोचल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली.
जिल्ह्याला मागील आठ ते दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले खरिपातील पिके हिरावली आहेत. जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीन, कपाशी व ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, दिवाळीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीचे प्रमाण वाढले.
यामुळे जिल्ह्यातील राजकीय पक्षांसह सामाजिक तसेच शेतकऱ्यांच्या संघटनांनी शेतीपिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचा आग्रह धरला होता. याबाबत जिल्हा प्रशासनानेही नुकसानीबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.
सर्वच १६ तहसीलदारांनी मंडळ अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकारी व ग्रामसेवकांची बैठक घेऊन तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले. या सोबतच जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पत्र देऊन नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी आदेशीत केले. विमा कंपनीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून सर्वेक्षण पूर्ण करावे, यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या.
दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी कृषी विभागाकडून शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल तालुका कृषी अधीकाऱ्यांकडून मागविला. यात जिल्ह्यातील तीन लाख ९२ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे कळाले. यात सर्वाधिक तीन लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या सोयाबीनचे अडीच लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर ज्वारी व कपाशी दीड लाख हेक्टरवर बाधित झाली. या नुकसानीची नेमकी माहिती अंतिम अहवालातून येईल, अशी माहिती या वेळी कृषी विभागाने दिली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1189794733012373504?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1189803119309254658?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

