Share

नांदेड जिल्हा; जलधरा भागात ५ दिवसांपासून अग्नितांडव

Published On: 

नांदेड : मराठवाड्यामध्ये वनसंपदेचे माहेरघर मानले जाणारे किनवट तालुक्यातील जलधरा भागात वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलात आगीने रौद्ररुप धारण केले आहे. पाच दिवसांपासून या आगीत लाखोंचे सागवान, मौल्यवान वृक्ष जळून खाक झाले. शेकडो पशु- पक्षी होरपळून गेले आहेत. मात्र या घटनेकडे पाहण्यास वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अजून वेळ मिळालेला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

चार दशकापूर्वी प्रादेशिक वन विभागाकडून किनवट तालुक्यातील जवळपास पन्नास टक्के राखीव जंगलाचे विभाजन करून किनवट व जलधरा शिवणी मांडवी अंबाडीचे राखीव जंगल वन विकास महामंडळाकडे जंगलाचा विकास करण्यासाठी सोपवण्यात आले होते. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत वन विकासासाठी महामंडळाने वनतळे, अर्थस्ट्रक्चर, नर्सरी, रोप लागवड या प्रकारची विविध विकासात्मक कामे करून किनवटच्या वनप्रेमी जनतेला भूरळ टाकली व वनविकास महामंडळ नावाचे रोपटे उभारीस आले

मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जलधरा येथील वनविकास महामंडळाच्या २ हजार हेक्टर जंगलामध्ये गेल्या २० वर्षात लागली नाही अशी आग २७ मार्चपासून लागली आहे. कक्ष क्रमांक २५६,२५७,२५८,२५९ मध्ये आगीचा वणवा अजूनही भडकत आहेत. यात मौल्यवान झाडे भस्मसात झाली. शेकडो पशु-पक्षी, प्राणी होरपळून मरण पावल्याचे सांगितले जात आहे. मात्र पाच दिवसानंतरही ही आग विझविण्यासाठी वन विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फुरसत मिळाली नसल्याने वनप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.त्यामुळे अवैध वृक्षतोड लपवण्यासाठी महामडंळाने हा जालिम उपाय शोधल्याची शंका जोर धरत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!