🕒 1 min read
उत्तराखंड : आजपासून यूपीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली तर उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीपासून निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi targets Congress) यांनी आज उत्तराखंडमध्ये ‘विजय संकल्प सभा’ला(Narendra Modi meeting in Uttarakhand)संबोधित करत कॉंग्रेसवर निशाणा साधला.
काँग्रेसने उत्तराखंडमधील जनतेला वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित ठेवले. (Congress depriving people of Uttarakhand of water for years) पाण्यासाठी माता-भगिनींना डोक्यावर हंडे घेऊन दूरवर जावे लागत होते. मात्र आम्ही ‘जल जीवन’ मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाईपद्वारे पाणी पोहोचवण्याची मोहीम सुरू केली. त्यामुळे आज उत्तराखंडमधील सुमारे 8 लाख घरांपर्यंत पाईपने पाणी पोहोचत आहे. असे मोदींनी म्हटले आहे.
कांग्रेस ने वर्षों तक उत्तराखंड की जनता को पानी की सुविधा से वंचित रखा।
पानी के लिए माताओं-बहनों को सर पर घड़ा रखकर कोसो दूर जाना पड़ता था।
हमने जल जीवन मिशन के जरिए घर-घर पाइप से पानी पहुंचाने का अभियान शुरू किया।
आज उत्तराखंड में करीब 8 लाख घरों तक पाइप से पानी पहुंच रहा है। pic.twitter.com/ZqObNYUad2
— BJP (@BJP4India) February 10, 2022
तसेच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेंतर्गत गेल्या ५ वर्षात इतके रस्ते बांधले आहेत, जे उत्तराखंडच्या निर्मितीनंतर कधीच बांधले गेले नाहीत. मात्र यांच्या काळात रुग्णालय आणि उपचाराअभावी लोकांना डोंगरावरून स्थलांतर करावे लागले. दुसरीकडे उत्तराखंडच्या १.२५ अब्ज लोकसंख्येला अटल आयुष्मान योजनेद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा भाजप सरकारने दिली. असेही मोदींनी म्हटले आहे.
त्यामुळे १४ तारखेला तुम्ही घराणेशाही आणि कुटुंबवादाला आळा घाला. या देवभूमीतून सांप्रदायिकतेला बाहेरचा रस्ता दाखवा. आणि उत्तराखंडच्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तराखंडच्या विकासासाठी, पर्यटन आणि रोजगारासाठी १४ तारखेला कमळाचे बटण दाबा असे आवाहनही मोदींनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Uttarakhand election 2022 : १४ तारखेला घराणेशाही आणि कुटुंबवाद मोडीत काढा- नरेंद्र मोदी
- IPL 2022: ‘हे’ तीन खेळाडू दशकानंतर आरसीबीमध्ये परतणार
- या ‘चार’ भारतीय क्रिकेटपटूंच कसोटी संघातील स्थान धोक्यात
- “गेल्या दहा वर्षांत उत्तराखंडची जनता काँग्रेसला लोकसभेत शून्य देत आहे”,नरेंद्र मोदींचा
- हिजाब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायलायचा नकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
