Share

राज ठाकरे माझे मित्र,ते ‘आपला माणूस’ नक्की पाहतील-नाना पाटेकर

Published On: 

पुणे – अनधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने विधान केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेचा सामना जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना करावा लागला होता मात्र  राज ठाकरे माझे मित्र आहेत आणि ते माझा ‘आपला माणूस’ चित्रपट नक्की पाहतील असा विश्वास  नाना पाटेकर यांनी व्यक्त केला आहे . आज ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते .

अभिनेता अजय देवगण याची निर्मिती असलेला ‘आपला माणूस’ हा सिनेमा येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे .अभिनेते नाना पाटेकर , सुमित राघवन, इरावती हर्षे या सगळ्या कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे सिनेमा हिट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे .या सिनेमाच्या प्रमोशन साठी नाना पाटेकर पुण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि नाना पाटेकर यांच्यात वितुष्ट आल्याच चित्र होतं मात्र आज नाना पाटेकरांनी राज ठाकरेंचा उल्लेख मित्र असा करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.दरम्यान या पत्रकार परिषदेत आपण राजकारणात जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले नाना पाटेकर ?
मी कुठल्या ही राजकीय पक्षात जाणार नाही जर पक्षात गेलो तर पक्षप्रमुखाला शिव्या घालाल व आठवडा भरात सर्व राजकीय पक्ष फिरून घरी बसेल. त्यामुळे राजकीय पक्षात जाणार नाही. राज ठाकरे माझे मित्र आहेत आणि ते माझा ‘आपला माणूस’ चित्रपट नक्की पाहतील . राजकीय व्यासपीठ वेगळं असत आणि हेवेदावे वेगळे असतात .जातीय तेढ सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. राजकीय नेते नोकऱ्या वर बोलत नाहीत त्यांना फक्त मतदार संघ वाढवायचे आहेत. सत्ताधरी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रशांवर बोलत नाहीत ,विरोधत असताना सर्व राजकीय पक्षांना शेतकरी दिसतात मात्र सत्तेत आल्यावर कोणी काही बोलत नाहीत ही शोकांतिका आहे. राजकारणात जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!