औरंगाबाद : शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयास माजी मुख्यमंत्री विलास देशमुख यांचे नाव देण्यात यावे. पानचक्की येथील महमूद दरवाजाची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात यावे इत्यादी समस्यांबाबत औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे पालकमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, विलासराव देशमुख यांचे औरंगाबाद शहरावर जास्तीचे प्रेम होते त्याचमुळे या शहराच्या विकासासाठी त्यांनी विविध मोठे प्रकल्प याठिकाणी आणले. मराठवाड्यामध्ये कॅन्सर उपचारांसाठी सुसज्ज असे रुग्णालय मुख्यमंत्री असतांना मंजूर केले. व शहराच्या विविध विकासात्मक कामे करण्यासाठी आपल्या काळात अतोनात प्रयत्न केले. औरंगाबादला कर्करोग रुग्णालय झाल्यामुळे सामान्य जनतेच्या मुंबईला उपचारासाठी जाण्याच्या फेऱ्या टळल्या. त्यामुळे या रुग्णालयास विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे.
तसेच शहरात पानचक्की येथील महमूद दरवाजाची दुरुस्ती करण्यात यावी, पावसाळ्यापूर्वी शहराच्या संपूर्ण नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई करावी. नाल्यांमधील केरकचरा दुसऱ्या ठिकाणी विल्हेवाट लावावी जेणेकरून तोच कचरा नाल्यांमध्ये येणार नाही व प्रत्येक वर्षी नवीन खर्च वाढणार नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे येणारे निवेदन, तक्रारी याबाबत महानगरपालिकेचे अधिकारी गंभीरपणे घेत नाही. चालढकल करतात यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन निर्देश देण्यात यावे.
महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित एप्रिल महिन्याचा पगार देण्यात यावा, शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. त्वरित पुतळ्याचे उद्घाटन करण्यात यावे व हा परिसर सामान्य जनतेसाठी लवकरात लवकर उघडा करण्यात यावा. चिकलठाणा येथील मिनी घाटी येथील ऑक्सिजन प्लांटचे काम लवकर पूर्ण करावे. अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, माजी मंत्री अनिल पटेल, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी व निमेश पटेल इत्यादी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मेणबत्ती दोन्ही बाजूंनी पेटवण्याचा आ. संजय शिंदे यांचा हा प्रयत्न झाकुन राहीला नाही : नारायण पाटील
- ‘मुस्कटदाबी करणाऱ्या सरकारला बहुजन समाज वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणार नाही’
- लसींचा तुटवडा भरून काढण्यासाठी गडकरींनी दिला मोलाचा सल्ला म्हणाले…
- भ्रष्ट राशन दुकानदारांवर कारवाई करा, रिपब्लिकन सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
- गॅगस्टर छोटा राजनची पुतणी प्रियदर्शिनी निकाळजेला ‘या’ कारणामुळे अटक

