Share

गॅगस्टर छोटा राजनची पुतणी प्रियदर्शिनी निकाळजेला ‘या’ कारणामुळे अटक

Published On: 

पुणे : बिल्डरला जीवे मारण्याची धमकी देऊन पन्नास लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी वर्षभरापासून फरारी असलेल्या गँगस्टर छोटा राजन याची पुतणी प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय ३६, रा. अनिता अपार्टमेंट, वानवडी) हिला पोलिसांनी अटक केली आहे. प्रियदर्शिनी निकाळजे ही गेल्या वर्षांपासून पोलिसांना हुलकावण्या देत होती. ती वानवडी परिसरात आल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सापळा रचून तिला अटक केली.

या प्रकरणी मंदार वाईकर (वय ३३, रा. निधीषा सोसायटी, मार्केट यार्ड) व धीरज बाळासाहेब साबळे (वय २६, रा. धानोरे, ता. खेड) यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात कात्रजमध्ये राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून निकाळजे, साबळे व वाईकर या तिघांविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या व्यावसायिकाच्या पत्नीला त्याच्यापासून घटस्फोट पाहिजे होता. त्यासाठी तिने त्यांच्याकडे तगादा लावला होता. या प्रकरणामध्ये दोघींची वाईकर याच्यासमवेत ओळख झाली. त्याने या प्रकरणामध्ये निकाळजे मध्यस्थी करेल, असे सांगत त्यांची भेट घडवून आणून दिली होती. दरम्यान, निकाळजे, वाईकर व साबळे यांनी संगनमत करून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या व्यावसायिकाविरुद्ध अर्ज दिला होता. ते प्रकरण मिटवून घेण्यासाठी निकाळजे हिने ठार करण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी २५ लाख रुपये स्वीकारतानाच साबळे याला गेल्यावर्षी १४ मार्चला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!