मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले कि , ‘जर मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर समस्या निर्माण होते. एका कंपनीऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना तसंच रॉयल्टी द्या. तसेच लसनिर्मिती वाढवण्यासाठी फॉर्म्युला देशभरातील इतर प्रयोगशाळांसोबत शेअर केला पाहिजे. माझी खात्री आहे की, प्रत्येक राज्यात किमान एक ते दोन अशा प्रयोगशाळा असतील ज्यांच्याकडे क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील. त्यांच्यासोबत फॉर्म्युला शेअर करा आणि लसनिर्मिती वाढवण्यासाठी समन्वय साधा. यानंतर ते देशात पुरवठा करतील. निर्मिती जास्त असेल तर ते निर्यातही करू शकतील. हे १० ते १५ दिवसांत केले जाऊ शकते,’ असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा यू-टर्न; पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल जनतेच्या मनात काय आहे’
- अखेर प्रतिक्षा संपली! फॅमिली मॅन २ चा ट्रेलर प्रदर्शित ४ जुनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या १५७ जणांवर गुन्हे दाखल
- संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या १५७ जणांवर गुन्हे दाखल

