Share

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव; विधेयक एकमताने मंजूर

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतच्या विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत विधेयक सभागृहात मांडले. त्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, शशिकांत शिंदे, संजय सावकारे, ज्ञानराज चौगुले, छगन भुजबळ, हर्षवर्धन सपकाळ, अजित पवार, मंदा म्हात्रे, दिलीप वळसे-पाटील, हरिभाऊ जावळे यांनी चर्चा करीत बहिणाबाईंच्या काव्य प्रतिभेचे स्मरण करीत सूचना केल्या.

विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले, या विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये बोली भाषा वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून विद्यापीठाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या कवितेमधून जो माणूस अपेक्षित होता तो या विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 11 ऑगस्ट रोजी बहिणाबाईंची जयंती असते. त्या दिवशी विद्यापीठाचा नामविस्तार कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला जाईल. या विद्यापीठात बहिणाबाई चौधरींच्या नावे अध्यासन सुरु करण्याबाबत विचार केला जाईल, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात लवकरच आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार – विनोद तावडे

मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!