Share

‘नायर’ रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Published On: 

मुंबई: नायर रुग्णालयाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. रुग्णालयाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. रुग्णालयाने १०० वर्षे केली आहेत. त्या निमित्ताने नायर रूग्णालयाला १०० कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाकाळात खरे देव डॉक्टर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रुग्णालय म्हणजे मंदिरच. यावेळी रुग्णालयाच्या कारकिर्दीची शॉर्टफिल्मही दाखवण्यात आली. मी फक्त कौतुक करु शकतो. शुभेच्छा देऊ शकतो. अभिनंदन करु शकतो. मात्र या संस्थेचा प्रवास सांगणारी जी एक शॉर्टफिल्म दाखवली ती थक्क करणारी आहे. सुरुवात कशी झाली. एखादी गोष्ट टिकवणं खूप गरजेचं असतं. संस्थेने त्या प्रतिकूल काळात काम सुरु ठेवलं. असे म्हणत त्यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.

ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचवण्याचं काम सर्व डॉक्टर्स आणि पारिचारिकांनी केलं आहे. रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेली शंभर वर्ष अहोरात्र मेहनत केली. मी मागे म्हटलं होतं. मंदिरं बंद आहेत, प्रार्थना बंद आहेत. देव आहेत कुठे? तर देव डॉक्टर्सच्या रुपात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!