🕒 1 min read
पुणे:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.
२६ जानेवारीला झालेल्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनावर अनेक गंभीर प्रश्न उठवले गेले. तर, या घटनेनंतर पुन्हा होणारा संघर्ष टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर रोडवर टोकदार खिळे ठोकले होते. खिळे रोवल्याचे फोटो आणि व्हिडीओ संपूर्ण देशात व्हायरल झाले. यानंतर, विरोधकांसह नागरिकांनी देखील या कृत्यावरून दिल्ली पोलीस व केंद्र सरकार यांच्यावर सडकून टीका केली होती.
दरम्यान, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत असं कधीच घडलं नाही. आंदोलक रस्त्यावर येऊ नये यासाठी खिळे ठोकू नये. सरकारने ही टोकाची भूमिका घेतली आहे. देशाचा अन्नदाता रस्त्यावर बसलेला असताना त्यांच्याशी सवांद साधायला पाहिजे. या आंदोलनाबद्दल भारतात सहानभूती तर होतीच, आता दुसऱ्या देशांमध्येही ती सहानभूती पाहायला मिळतेय. हे सरकारसाठी फारसं चांगलं नाहीय. आपल्या राज्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलन गांभीर्याने घेतलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘रूट को जड़ से उखाड़ देंगे ! अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला अँड्य्रू फ्लिंटॉफने दिले भन्नाट उत्तर !
- परळी शहरात दहा लाखांची चोरी; काही दिवस आधिच आयजींकडून झाला आढावा
- ‘देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय’
- विजय हजारे ट्रॉफीला येत्या २० फेब्रुवारीपासून होणार सुरुवात
- आरटीओंची धडक मोहीम; खासगी बसेसवर केली कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
