🕒 1 min read
चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळाला 6 फेब्रुवारी सुरुवात झाली आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रुट सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मागील श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने द्विशतकी आणि दीडशतकी खेळी केली होती. शुक्रवारपासून (०५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर त्याने शतक पूर्ण केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवातही धडाकेबाज फलंदाजीने करत त्याने द्विशतक झळकावले आहे.
@flintoff11 @imVkohli @root66 @englandcricket Root who ? जड़ से उखाड़ देंगे Root ko ..!!!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 27, 2016
दरम्यान, २०१६च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानचा झालेला किस्सा सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे जो रुट याने धडाकेबाज फलंदाजीने द्विशतक झळकावले आहे. त्यावेळी फ्लिंटॉफने एक ट्विट केले होते. त्यात त्यानं म्हटलं होतं की, ‘विराट कोहली जर याच गतीने खेळत राहीला तर तो एकदिवस नक्कीच जो रुटची बरोबरी करु शकेल.’ त्यावर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रतिउत्तर दिले होत. बिग बींनी त्या ट्विटवर उत्तर देताना म्हटले की, ‘ कोण आहे हा रुट, या रुटला मुळापासून उखडून टाकू…’
With the greatest respect , this aged well ???? https://t.co/sjhs7HGT1d
— Andrew Flintoff (@flintoff11) February 6, 2021
त्यावरून फ्लिंटॉफनं शनिवारी बिग बी यांना ट्रोल केलं. फ्लिंटॉफने ट्विटमध्ये म्हटले की, ‘अमिताभ बच्चन यांचा मी आदर करतो. पण आता त्यांचे वय झाले आहे.’ दरम्यान, १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या रूटनं चेन्नईवर २१८ धावांची खेळी करताना विश्वविक्रम नोंदवला. बेन स्टोक्सनंही तुफान फटकेबाजी करून ८२ धावा कुटल्या. इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी ८ बाद ५५५ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
- लवकरच लाँच होणार रियलमीचा नवीन स्मार्टफोन !
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या ‘या’ एक्स्पर्टवरही आयपीएल लिलावात लागणार दाव
- ‘बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री झाल्यास जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
