नागपूर : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी तपासणी करणे, क्वारंटाईन करणे आणि आवश्यक वैद्यकीय उपचाराची यंत्रणा बळकट करणे, या त्रिसूत्रीवर मुंबईमध्ये उद्रेक नियंत्रणात आणता आला. याप्रमाणे नागपूर येथे देखील झोननिहाय वॉर रूम तयार करून ‘एकछत्री समन्वयात’ या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करीत कोरोना प्रतिबंध शक्य आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी शुक्रवारी येथे केली.
नागपूर शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या बघता मुंबईतील धारावी व कोळीवाडा येथील कोरोना उद्रेक ज्या पद्धतीने नियंत्रणात आणला, त्याच पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी चहल उच्चस्तरीय तज्ज्ञ मंडळासह शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर व जिल्हा प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकार्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या पथकात डॉ. हेमंत शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुजल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांचा सहभाग होता.
फडणवीसांचा तो शब्द मी करणार पूर्ण, ‘या’ खासदार साहेबांनी केली घोषणा
तज्ज्ञांनी केलेल्या सूचना चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात याव्यात, आरटीपीसीआर चाचणीचा अधिक वापर व्हावा, गंभीर रुग्ण संशयित रुग्ण यांच्यासाठीच फक्त अँन्टिजेन चाचणीचा वापर करण्यात यावा, अँम्बुलन्सची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात यावी, खासगी असो वा सरकारी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वॉर रूम उघडली गेली पाहिजे, माहिती सदैव अद्ययावत झाली पाहिजे,गंभीर रुग्णाच्या इलाजाबाबतचे प्रत्येक दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये साठवले गेले पाहिजे, बेडची उपलब्धता ऑनलाईन पद्धतीने सर्वांना माहीत झाली पाहिजे, हॉस्पिटल्सच्या कॅन्टीन्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावे असेही त्यांनी नमूद केले.
रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील जंबो कोविड सेंटरवर फौजदारी कारवाई करा !


