Share

फडणवीसांचा तो शब्द मी करणार पूर्ण, ‘या’ खासदार साहेबांनी केली घोषणा

Published On: 

नागपूर : मागील सरकारने अनेक लॉलीपॉप जनतेला दिले. निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासनांच्या बाजार मांडला होता. चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर शहर वायफाय शहर करणार, पण जो शब्द फडणवीस सरकार पूर्ण करू शकले नाही. तो शब्द मी पूर्ण करणार, अशी घोषणा खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. तसेच या संदर्भातला प्रस्ताव आठवडाभरात पूर्ण करण्याच्या सूचना दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत बाळू धानोरकर यांनी दिल्या आहेत.

बीएसएनएल आधी घराघरात वापरले जायचे. मात्र आता कालांतराने वापर कमी होत आहे. भविष्यात इतिहास जमा न होता येत्या काळात बी. एस. एन. एल. चे जुने दिवस परत आणण्याकरिता काम करा, अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असते यामध्ये तारा तुटल्यास अनेक दिवस सेवा खंडित होत असतात. त्यामुळे तारा दर्शविणारे फलक लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील जंबो कोविड सेंटरवर फौजदारी कारवाई करा !

खासगी दूरसंचार कंपनीला स्पर्धक ठरण्यासाठी बीएसएनएल अद्याप २ जी व ३ जी सर्विस देत आहे. दुसरीकडे खाजगी कंपनी ४ जी सेवा देत असून ५ जी कडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे बीएसएनएल ग्राहकांच्या पसंतीला कमी पडताना दिसत आहे. परंतु हे चित्र फार वाईट असून येत्याकाळात हे चित्र बदलविण्या करिता प्रयत्न करणार असल्याचे धानोरकर यांनी सांगितले.

मोहटादेवीच्या आशीर्वादानेच मी आमदार झालो- आ.निलेश लंके

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!