भंडारा : नागपुरात करोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. आता हळूहळू मृत्यूदेखील वाढत असून, ही स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे नागपुरला आयसोलेशन धोरण आखण्याची गरज आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन आयसोलेशन करण्याची गरज आहे. त्यामुळे मृ्त्यू संख्येवर नियंत्रण आणता येईल. गेल्या दौऱ्यात मी अधिकाऱ्यांसी यासंबंधी चर्चा केली होती. आता हे धोरण आक्रमकपणे राबवण्याची गरज आहे,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
विदर्भातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नागपुरात आले असता फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला. विशेष म्हणजे रुग्णालयांमधील उपचार खर्चावरील दरांवर नियंत्रण आणण्यासंबंधी विचारले असताना यावेळी त्यांनी राज्य सरकार दबावाखाली काम करत असल्याची शंका व्यक्त केली. आघाडी सरकारचा बदल्या करणे हा एकमेव धंदा असल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
“सपूर्ण शासन फक्त बदल्यांच्या मागे लागले आहे. बदल्या करणे हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. बदल्या महत्त्वाच्या आहेत पण एखाद्या वर्षी नाही केल्या म्हणून काही फरक पडत नाही. बदल्यांचा एका वर्षाचा खर्च ५०० कोटींच्या घरात जातो. करोना संकट असताना या बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. पण मंत्री, प्रशासन सगळेजण कोणाला कशी पोस्टिंग मिळणार, कुठे बदली होणार यात गुंग आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“बदल्या दरवर्षी होत असतात पण आमच्या काळात करोना नव्हता. जर आमच्या काळात करोना असता आणि बदल्या झाल्या असत्या तर बोट दाखवता आले असते. बदल्यांचा भत्ता देण्यासाठी ५०० कोटी लागतात. येथे पगार देण्यासाठी पैसे नाही आणि मग बदल्या कशाला सुरु आहेत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
काँग्रेसच्या माजी खासदारांच निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !
उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची शिवसेना नेते नागेश वनकळसे यांची मागणी
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना घेतलं ताब्यात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

