नवी दिल्ली : आपल्याकडे एक म्हण आहे, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. पाकिस्तानबाबत तीच म्हण तंतोतत लागू होत आहे. भारताने अनेकदा समजावूनही पाक देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर अत्याचार सुरूच आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या रहीम यार खान जिल्ह्यात मुस्लिमांच्या जमावाने गणपती मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओत शेकडोंचा जमाव मंदिराच्या खिडक्या, दरवाजे व मूर्ती तोडताना दिसत आहे. यादरम्यान पोलिसांनी भेकडपणे फक्त पाहण्याचे काम केले.
दरम्यान, मंदिराच्या तोडफोड प्रकरणी भारताने दिल्लीतील पाकिस्तानी मुत्सद्द्याला पाचारण केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. या प्रकारामुळे भारतवासीय तसेच जगभरातून संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तान आणि हे दृष्कृत्य करणाऱ्या धर्मांध समाजकटकांचा निषेध व्यक्त होत आहे.
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या, लोकांना चिथावणी देणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. त्याशिवाय मंदिराची दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले. तसेच सरकार मंदिराचा जिर्णोद्धार करणार असल्याचेही सांगितले. पाकिस्तानचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी पंजाबच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना पाचारण केले आहे. या मुस्लिमबहुल भागातील मंदिर परिसरात हिंदूंची ८० पेक्षा जास्त घरे आहेत.
पंजाब प्रांतातील भोंग शहरातील मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर पाकिस्तानमधील हिंदू समुदाय आणि मानवाधिकार संघटनांनी संताप व्यक्त केला होता. हिंदू संघटनांनी निदर्शनेही केली.
यापूर्वी पाकमध्ये हिंदू मंदिरावर अनेकदा हल्ले
पाकिस्तानमध्ये मागील हिंदू मंदिरावर याआधीही हल्ले झाले आहेत. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदाय असलेल्या हिंदूवर मागील काही काळात अत्याचारात वाढ झाली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस खैबर पख्तूनख्वा प्रातांत एका धर्मांध मौलवीच्या नेतृत्वात हिंदू मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली. हिंदू संत परमहंस महाराज यांच्या मंदिराला आग लावण्यात आली होती. ही घटना करक जिल्ह्यातील तेरी भागात झाली. तर, मार्च महिन्यात रावळपिंडी शहरात १०० वर्षाहून अधिक जु्न्या हिंदू मंदिरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना हल्ला झाला.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमृता फडणवीस यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, म्हणून त्यांनी ‘हे’ करावे’
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- प्रतिस्पर्धी ग्रेट ब्रिटनने वाढवले भारतीय महिला संघाचे मनोबल म्हणाले…
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

