🕒 1 min read
नागपूर : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं उच्चांक गाठले आहेत. इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्वसामान्य लोक नाराज आहेत. पेट्रोल-डिझेलच्या पर्यायी व्यवस्थावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा पर्याय सुचवले आहेत. नागपूर येथे पेट्रोल- डिझेल संदर्भात प्रश्नाचे उत्तर देताना गडकरींनी आपल्या मनातील इच्छा बालून दाखवली आहे. देशातील पेट्रोल व डिझेल पंप नाहीसे व्हावेत हीच माझी इच्छा असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या सामंजस्य करारानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कचा सामंजस्य करार एनएचएलएमएल व जेएनपीटी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट यांच्यात झाला. कार्यक्रमाला जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, एनएचएलएमएलचे सीईओ प्रकाश गौर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस आदी उपस्थित होते.
पेट्रोल-डिझेलचे वाढीव दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या बॅरलवर अवलंबून आहेत. परिणामी भाव वाढत आहेत. भविष्यात पेट्रोल पंप बंद व्हावेत हीच माझी इच्छा आहे. यावरील प्रभावी उपाय म्हणूनच इथेनॉलसारखे पर्यायी इंधन आहे. इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारे इंधन असून ते विमानातील इंधनासाठीही यशस्वी झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज असून इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी, इलेक्ट्रिक हे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. या इंधनाचा पर्याय सर्वांना स्वीकारावा लागणार आहे, असे गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या जाहीर कार्यक्रमात अनेकदा पेट्रोल-डिझेलला पर्याय सुचवला आहे. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय. ऊसाचे साल, कॉटन, मका व तांदुळ यापासून इथेनॉल बनवता येते. यातून पेट्रोल-डिझेलला पर्याय तर मिळेलच सोबतच रोजगार देखील निर्माण होतील. गडकरी यांच्या या विधानानंतर राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- अखिलेश यादव आणि प्रियंका गांधींची विमानामध्ये भेट; नेमके काय झाली चर्चा?
- नाशिकमध्ये यंदा शिवसेनाच सत्तास्थानी असणार; संजय राऊतांचा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

