सांगली : कसबे डिग्रज येथे दिपाली सय्यद भोसले यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रसतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मदत देण्यात आली. त्यापूर्वी झालेल्या भाषणामध्ये केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी या फाउंडेशनचे कौतुक केले आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणाचा धागा पकडत कपिल पाटील यांनी सांगितले की, ‘काकांनी सांगितले तुम्हाला भीती वाटू लागली का काय? पण, त्यांनी समाजासाठी चांगले काम आहे. काका मला मठात घेऊन गेले आणि मी मंत्री झालो. पण संजयकाका यांना मठात घेऊन जा तेही मंत्री होतील’.
योगी आदित्यनाथ यांच्या बरोबर त्यावेळी मी मठात गेलो असतो तर त्यावेळी मंत्री झालो असतो. राज्यपाल यांनी मला विमानातून आणले तर मी येऊ शकेल म्हणून केंद्रातील मंत्री म्हणून मला राज्यपाल यांनी घेऊन आले. आता असे झाले की विरोधक पण राज्यपाल यांच्याकडे जातात, अशी टीकाही यावेळी कपिल पाटलांनी केली आहे.
स्वतःसाठी जगणारी माणसे असतात पण दुसऱ्यासाठी जगणारी कमीच आहेत. माणसांवर प्रेम करणारी माणसं म्हणजे दिपाली सय्यद भोसले आणि त्यांचा ट्रस्ट. या ट्रस्टच्या माध्यमातून खूप मोठे काम आज समाजात होत असल्याचा आनंद वाटतो, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता
- शिवसेनेत गृहकलह ? भावना गवळींकडून जीवाला धोका; शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे – पटोले
- गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली; शिवसेना नेत्यानेच केला दावा


