Share

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी २५ हजार मुलींच्या उपस्थितीत जाणीव जागृती कार्यक्रम- पंकजा मुंडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या बुधवारी (ता. 3 जानेवारी) पुणे येथे २५ हजार मुलींच्या उपस्थितीत भव्य अशा जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव (जि. सातारा) या जन्मगावापासून या योजनेचा जाणीव जागृती अभियान चित्ररथ निघणार असून १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव असलेल्या सिंधखेडराजा (जि. बुलढाणा) येथे त्याचा समारोप होणार आहे. मुलींचा जन्म आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या काळात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. अशी माहिती महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

बालेवाडी, पुणे येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे बुधवार दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पुणे आणि परिसरातील 25 हजार मुली सहभागी होणार आहेत. राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या मुलींना या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे. याशिवाय याच दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (जि. सातारा) येथून जाणिव जागृती अभियान चित्ररथ निघणार आहे. हा चित्ररथ ५ जानेवारी रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या वणंदगाव (जि. रत्नागिरी) येथे तर ८ जानेवारी रोजी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (जि. अहमदनगर) येथे जाईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे या रथाचा समारोप होईल.

या रथाच्या माध्यमातून ‘मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा’चा प्रभावी जनजागर केला जाणार आहे. याशिवाय यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ आणि केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेविषयी या मोहीमेत माहिती दिली जाणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!