नवी दिल्ली – दिवाळीनंतर गेल्या काही दिवसांत देशातील काही राज्यांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं असून देशात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तेथील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील रणनीती जाणून घेतली.
यावेळी महाराष्ट्रात दररोज 80 हजार चाचण्या केल्या जात असून कोविड नंतरच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं जात असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 5 टक्क्यांच्या खाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून नागरिकांनी सतत हात स्वच्छ करणे, मास्क परिधान करणे आणि शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास संभाव्य दुसऱ्या लाटेला थोपवता येणं शक्य असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात लसीकरण आणि तिचे वितरण यासाठी एक कृती गट स्थापन करण्यात आला असल्याची ठाकरे यांनी या बैठकीत दिली. कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती देताना ठाकरे यावेळी म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता, त्याचे दुष्परिणाम, त्याची परिणामकरकता, लसीवरील येणारा खर्च आणि त्याचे वितरण याबाबतीत हा कृतीदल चर्चा करणार आहे.
राज्यात राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेनं महत्त्वाची भूमिका पार पाडली असून त्यामुळे संसर्ग रोखण्यात यश मिळालं असून दोन महिन्यात प्रतिदिन 24 हजार असणारी संख्या 5 हजारांवर आली असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. या मोहिमेअंतर्गत ११ कोटी ९२ लाख लोकांच्या आरोग्याची माहिती प्राप्त झाली असून 51 हजार रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने आणखी एक डिजीटल स्ट्राईक करत घातली ‘या’ अॅप्सवर घातली बंदी
- ‘मंदिर विषयावर शुद्र राजकारण करणं योग्य नाही,पण निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही’
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- पदवीधर मतदारांना 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा
- 69 हजार पेट्रोल पंपांवर किमान एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग किऑस्क स्थापन केले जाणार


