🕒 1 min read
रावळपिंडी : 1 डिसेंबर पासून पाकिस्तान आणि इंग्लंड (Pak vs ENG) यांच्यामध्ये कसोटी सामना खेळला जाणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर कसोटी सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहे. इंग्लंडचा तब्बल 17 वर्षातील हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. यापूर्वी इंग्लंडने सात सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान दौरा केला होता.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी रावळपिंडी येथे पत्रकार परिषद भरवण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने (Nasim Shah) अनेक विषयांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेमध्ये नसीमला इंग्लंडच्या दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या कारकीर्दीबद्दल विचारले गेले. नसीमने या खेळाडूच्या खेळाची प्रशंसा करत उत्तर दिले.
नसीम म्हणाला की,”मी सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे मला माहित आहे, ते किती कठीण आहे. जेम्स अँडरसन एक खूप चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडून मी खूप काही शिकलो आहे. त्याचबरोबर आम्ही भेटल्यानंतर याबद्दल चर्चा करत असतो. वयाच्या 40 व्या वर्षी तो खेळत आहे आणि अजूनही खूप तंदुरुस्त आहे. त्यामुळे तो किती मेहनत घेत आहे याची कल्पना तुम्ही करू शकता.”
या पत्रकार परिषदेमध्ये पुढे नसीमला स्पीड आणि कौशल्य या वादावर त्याचे मत विचारले. या प्रश्नाचे उत्तर देत तो म्हणाला की,”जेम्स अँडरसनकडे पूर्वीसारखा वेग नसला, तरी त्याच्याकडे खेळण्याची कौशल्य अजूनही आहे.” हे वाक्य संपल्यानंतर नसीमला घाम फुटला. कारण इंग्रजीत विचारलेला पूर्ण प्रश्न त्याला समजू शकला नाही. त्यावर तो म्हणाला की,”मला फक्त 30 टक्के इंग्रजी येते. माझी इंग्रजी संपली.” नसीमचे हे वाक्य ऐकल्यानंतर संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये हास्य पसरले.
पुढे नसीम म्हणाला की,”मी तुम्हाला या आधी देखील सांगितली होती की,”तो एक महान गोलंदाज आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे कौशल्य आहेत. विकेट्स कधी आणि कशा काढायच्या हे त्याला व्यवस्थित माहित आहे. कारण तो जगभरात क्रिकेट खेळला आहे. त्यामुळेच तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Dragon Fruit | नावाप्रमाणे पॉवरफुल आहे ड्रॅगन फ्रुट, करतो ‘हे’ आजार दुर
- IPL 2023 | आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये बोली लावताना बेशुद्ध झालेले ‘ह्यूग एडमीड्स’ या वर्षीसुद्धा सांभाळणार लिलावकर्त्याची जबाबदारी
- World Aids Day | HIV ची सुरुवात कुठून झाली?, जाणून घ्या
- Amol Mitkari | “आता अस्वस्थ असलेले मुख्यमंत्री दारोदार…”, अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला
- Udayanraje Bhosale | “एवढी मोठी घोडचूक केली आहे, तरीही एखादा निर्लज्जच…”, उदयनराजे भोसले कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
