Share

Amol Mitkari | “आता अस्वस्थ असलेले मुख्यमंत्री दारोदार…”, अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

Amol Mitkari | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारबद्दल मोठं विधान केलं आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे जावून कमाख्या देवीचं दर्शन घेतल्यावरुन देखील अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला.

यावेळी, शिंदे-फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला आहे. या सरकारवर आजच निर्णय होणार होता, मात्र न्यायमूर्ती रजेवर गेले आहेत. त्यामुळे आता अस्वस्थ असलेले मुख्यमंत्री दारोदार नवस करत फिरत आहेत. त्यामुळेच ते कामाख्या देवीच्या दर्शनालाही गेलेत, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.

यादरम्यान, शिंदे गटाचे सगळे आमदार डिसक्वालीफाईड होतील, हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे. या 40 आमदारांचा भारतीय जनता पार्टीने राजकीय बळी घेतला आहे, असं देखील मिटकरी म्हणाले.

दरम्यान, ज्या महाराष्ट्रात गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करून जनप्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जादुटोणा बुवाबाजीवर विश्वास ठेवतात हे काही फार चांगलं नाही. यासाठीच आज गाडगे बाबांच्या या भूमित येऊन हे सरकार गेलं पाहीजे आणि जनतेला अपेक्षित असलेल महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं पाहीजे एवढीच विनंती करतोय, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या