🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: 2023 मध्ये आयपीएल (IPL 2023) चा सोळावा हंगाम खेळला जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या सर्वात मोठ्या लीगसाठी सर्व 10 संघांनी संघ बांधणी सुरू केली आहे. आयपीएल 2023 साठी कोचीमध्ये एक मिनी लिलाव (Mini Auction) आयोजित करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या लिलावात लिलावकर्ता कोण असणार? याची उत्सुकता आयपीएल चाहत्यांना लागली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षी देखील ह्यूग एडमीड्स (Hugh Edmeades) आयपीएल लिलावामध्ये लिलावकर्त्यांची जबाबदारी पार पडणार आहेत.
IPL 2023 मध्ये ह्यूग एडमीड्स पार पडणार लिलावकर्त्यांची जबाबदारी
2022 च्या आयपीएल लिलावामध्ये ह्यूग एडमीड्स यांच्यासोबत एक अपघात झाला होता. त्यानंतर यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये ह्यूग एडमीड्स यांचे पुनआगमन होत आहे. आयपीएल 2022 साठी लीलाव सुरू असताना ह्यूग एडमीड्स चक्कर येऊन जमिनीवर कोसळले होतो. त्यानंतर ते लिलावातून बाहेर पडले होते. ह्यूग एडमीड्सनंतर चारू शर्मा यांनी आयपीएल लिलावकर्त्यांची भूमिका पार पडली होती. ह्यूग एडमीड्स लिलावाच्या शेवटच्या टप्प्यात परत आले होते. त्यानंतर सर्वांनी त्यांच्या कौतुक केले होते. आता यावर्षी पुन्हा एकदा ह्यूग एडमीड्स लिलावकर्ता म्हणून दिसणार आहेत.
ह्यूग एडमीड्सने स्टारस्पोर्टला सांगितले आहे की, ते आयपीएल लिलावामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर पहिल्यांदाच कोचीला भेट देण्यासाठी ते उत्सुक आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने आयपीएल लिलाव 2023 आयोजित करण्यास सांगितल्याबद्दल मी उत्साहीत आहे.
आयपीएल लिलाव भारताच्या बाहेर होणार असल्याच्या चर्चा सुरू होत. मात्र, तो आता बाहेर न होता भारतातच होणार आहे. आयपीएल लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. यावर्षी आयपीएल लिलाव एक दिवसाचा असणार आहे. ज्यामध्ये सर्व दहा संघ आपल्या खेळाडूंसाठी बोली लावतील. आयपीएल लिलावापूर्वी सर्व फ्रेंचाईजींनी जाहीर केलेल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- World Aids Day | HIV ची सुरुवात कुठून झाली?, जाणून घ्या
- Amol Mitkari | “आता अस्वस्थ असलेले मुख्यमंत्री दारोदार…”, अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला
- Udayanraje Bhosale | “एवढी मोठी घोडचूक केली आहे, तरीही एखादा निर्लज्जच…”, उदयनराजे भोसले कडाडले
- Cabinet expansion | मंत्रिमंडळ विस्तारात नितेश राणे, रवी राणा, बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार?
- BJP | “जर पुरावे दिले नाही तर आदित्य ठाकरे यांचे तोंड…”; भाजपच्या ‘या’ नेत्यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
