🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार विद्या चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणं शक्यच नाही. माझ्या दोन्ही सुनांना मी मुलींसारखंच वागवलंय. त्यामुळं मुलासाठी छळ होतोय हे आरोप निराधार आहेत. गौरीला पहिली मुलगी झाली तेव्हाही आम्हाला आनंद झाला होता आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माचाही आनंदच आहे,’ असे चव्हाण म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘अन्य कुणाच्या तरी किंवा वकिलांच्या चुकीच्या सल्ल्यामुळं ती तसं वागतेय. खरंतर माझा मुलगा आणि सून दोघेही सज्ञान आहेत. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. पुढं काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे. नवरा-बायकोच्या वादात मला विनाकारण ओढण्यात आलंय, असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, चव्हाण म्हणाल्या, ‘१० डिसेंबर रोजी माझा मुलगा कामानिमित्तानं डेन्मार्कला कंपनीच्या ट्रेनिंगसाठी जाणार होता. त्याच्या काही दिवस आधी त्याला सुनेच्या मोबाइलवर काही आक्षेपार्ह मेसेज आढळले. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यातून समोर आलं. त्याला धक्का बसला. त्यानं त्याबाबत आम्हाला सांगितलं, असं चव्हाण यांनी सागितले.
तसेच नंतर गौरीशी (सुनेशी) बोलून वेगळं होण्याचा त्याचा निर्णय सांगितला. आपल्या सगळ्या गोष्टी उघड झाल्याचं लक्षात येताच तिनं वकिलांचा सल्ला घेतला आणि आरोप सुरू केले. तिनं आमच्याविरोधात ३ कोटींचा दावाही केलाय. अर्थात, ती खोटं बोलते आहे हे यथावकाश समोर येईल. प्रकरण न्यायालयात असल्यानं मी त्यावर अधिक बोलू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली. याचप्रमाणे ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेनं आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती असं वागत असून न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल,’ असं चव्हाण यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

