Share

‘मेरा बूट सबसे मजबूत’ची लाट महाराष्ट्रात, सावंतांचे भाजपवर टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- भाजपसाठी संकटमोचक ठरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या होमग्राउंड जळगावमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पहायला मिळाली आहे. हाणामारी कार्यकर्त्यांमध्ये अथवा दोन वेगळ्यापक्षातील नेत्यांमध्ये झाली नसून भाजपच्याच जेष्ठ नेत्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे राज्यभरात भाजपसाठी संकटमोचक असणाऱ्या महाजन यांच्यावर आपल्या घरातील बंडखोरीचे संकट आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना-भाजप संयुक्त मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार ड़ॉ. बी.एस. पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली आहे. जळगाव लोकसभेचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे भाजप – सेना कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाघ आणि पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. पुढे सर्व प्रकार हाताबाहेर जात एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.

आता याच मुद्द्यावरून महाजन आणि भाजपवर टीका होऊ लागली असून कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.मेरा बूट सबसे मजबूतची लाट महाराष्ट्रात आली असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील भाजपला चिमटा काढला आहे. भाजपामधील अंतर्गत असंतोष टोकाला पोहोचला असून सत्ता जात असल्याने भाजपा वैफल्यग्रस्त झाला आहे असं पाटील यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!