मुंबई: कर्नाटक हिजाब प्रकरण सध्या देशात मोठा चर्चेचा मुद्दा ठरला असून, त्यावर सर्वच राजकीय आणि सामाजिक स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान हिजाब बंदी प्रकरण न्यायालयात न्यायासाठी प्रतीक्षेत आहे. यावरची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. मुंबईत आणि पुण्यात या बंदीचे पडसाद उमटले आहेत. मुंबई आणि पुण्यात त्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे.
त्यावर आता प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि गृहनिर्माण कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या हिजाब बंदिवर आपले मत दिले आहे. ट्विट करत आव्हाडांनी भाजपवर निशाण साधला आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणतात, मुलींनी स्कर्ट घालणे त्यांना नको, मुलींनी जीन्स घालणे त्यांना नको, मुलींनी हिजाब घालणे त्यांना नको, एवढं आहे तर या सगळ्या समस्यांवर सगळ्यात चांगला तोडगा म्हणजे, तुम्ही ड्रेस डिझायनिंग मंत्र्यांची नियुक्ती करून टाका. असे आव्हाड म्हणाले.
बुधवारी लोकसभेमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या मुद्द्यावरून टीका केली आहे. तसेच, महिलांच्या कपड्यांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कर्नाटक भाजपचे आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उठवली. “महिलांच्या काही कपड्यांमुळे पुरूष उत्तेजित होतात आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होते”, असं विधान रेणुकाचार्य यांनी केलं होतं. या विधानाचा सुप्रिया सुळे यांनी संसदेत निषेध नोंदवला होता.
महत्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्रात टोळीचे सरकार – चंद्रकात पाटील
- मुस्लिम भगिनींनी माझे कौतुक केल्या“महाराष्ट्राच्या बदनामीच काय…”; चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीवर टीका
- मुळे विरोधकांच्या पोटात दुखते, नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका
- नरेंद्र मोदींचे आश्वासन पूर्ण; शेतकऱ्याच्या खात्यात आले पंधरा लाख; मात्र…
- ‘गोव्यात बेरोजगारी वाढण्यास भाजप जबाबदार’; नवाब मलिकांचा आरोप


