🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ सिल्लोड येथे सभा झाली.
यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्रातील मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवावा आणि भगवा खांद्यावर घ्यावा असं आवाहन उपस्थितांना केले. तसेच या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आज आपल्यासोबत सत्तार आहेत उद्या आपल्या हातात सत्ता येईल. शेवटी वाघ हा एकटा लढून जिंकत असतो म्हणत शहरातील बंडखोरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे टोला लगावला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रेवश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून अब्दुल सत्तारांना सिल्लोड मधून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याच प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा आज सिल्लोड येथे झाली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183325843315032065?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183325448433848322?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183323239021309954?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

