Share

शेताला पाणी देण्यावरून खून, महिलेसह तिघांना जन्मठेप

Published On: 

परभणी : पाच वर्षापूर्वी शेताला पाणी देण्याच्या पाईपवरून वाद घालून एका व्यक्तीचा चाकूचे वार करीत निर्घृण खून केल्याची घटना २०१५ रोजी घडली होती. याप्रकरणी परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

परभणी येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात खिजर मसियोद्दीन यांनी एक तक्रार दाखल केली. वांगी रस्त्यावरील साईबाबा नगर येथे १३ डिसेंबर २०१५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भाऊ अजहर मसियोद्दिन यांच्या शेताला पाणी देण्याच्या पाईपवरून वाद झाला. त्या पाठोपाठ रईसोद्दीन हा त्याचे वडील अमिरोद्दीन, आई रौफाबी उर्फ गौरी बी व भाऊ अकबरोद्दीन यानेही भांडणात सहभाग घेतला.

शेताच्या जुन्या वादाच्या कारणावरून रईसोद्दिन उर्फ गुड्डुने अजहर यास पोटात, डोक्यावर, पाठीवर वार करून जागीच ठार केले होते. आपण अजहर यास वाचविण्याकरिता पुढे आलो असता आरोपी अमिरोद्दीन याने पोटावर वार केले. आरोपी गौरी बी ने लोखंडे पाईपने अजहर याच्या डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले. आरोपी अकबरोद्दीनने लाथाबुक्काने आपणास मारहाण केली. संगनमत करून गुन्हा घडवून आणला, असे या फिर्यादीत म्हटले होते.

पोलिस निरीक्षक सुधाकर जगताप यांनी या प्रकरणात तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. सुभाषराव देशमुख (हट्टेकर) यांचा युक्तीवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणातील एक आरोपी अमिरोद्दीन हे मृत झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!