Share

मनपा पथक रस्त्यावर; कोरोना नियम तोडणाऱ्या नागरिकांना बजावला दंड

Published On: 

लातूर : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेल्या सुचनानंतर मनपा प्रशासन हे खडबडून जागे झाले आहेत. महानगर पालिकेच्या पथकाने महात्मा गांधी चौक येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १२२०० दंड वसूल केला आहे. कोरोना नियम भंग करणाऱ्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष केले जाणार नाही असे, मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही मागील काही दिवसांत वेगाने वाढत आहे. त्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील कोचिंग क्लासेस व मंगल कार्यालय यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी बैठकीत कोचिंग क्लासेस व मंगल कार्यालयांना कोरोना नियम सक्तीने पाळण्यात यावे अशी सुचना केल्या. जर नियम पाळण्यात कोणतीही कसुर आढळल्यास कडक शासन केले जाईल.

यादरम्यान शनिवारी आयुक्त आमन मित्तल यांच्या आदेशा प्रमाणे आज झोनल अधिकारी यांनी महात्मा गांधी चौक येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना तब्बल १२२०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. एकूण १२२ नागरिकांवर यावेळी कारवाई करण्यात आली. यावेळी झोन डी चे झोनल अधिकारी बंडू किसवे, गांधी चौक पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक हीबारे, स्वच्छता निरीक्षक धोंडीराम सोनवणे, रवी कांबळे, अमजद शेख, हिरालाल कांबळे, प्रदीप गायकवाड, सुहास भिकाने व पदाधिकारी हजर होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!