Share

‘मुंडेंच्या दुसऱ्या पत्नीने शोषणाचे आरोप केले आहेत, आशा आहे शरद पवार यात लक्ष घालतील’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या संदर्भात रेणू शर्मा यांनी पोलिसांकडे देखील धाव घेतली होती. मात्र, यानंतर रेणू शर्मा यांनी मुंडेंवरील तक्रार मागे घेतली होती. तसे त्यांनी पोलिसांना लेखी लिहून दिलं आहे.

मुंडेंवरील हे विघ्न तळल्यानंतर मराठवाड्यात त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. कुठे जेसीबीने फुले उधळली जात आहेत, तर कुठे क्रेनने भले मोठे हार त्यांच्या गळ्यात घातले जात आहेत. धनंजय मुंडे देखील भावून झाल्याचं दिसून आलं. आता धंनजय मुंडे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार असं दिसत आहे. धनंजय मुंडे यांचे संबंध असलेल्या करुणा शर्मा यांनीच आता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहेत. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घालावे अशी विनंती देखील केली आहे. ‘मी आता ऐकले की करुणा धनंजय मुंडे (करुणा शर्मा) मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने धनंजय मुंडे यांच्यावर शोषणाचे आरोप केले आहेत. यापूर्वी त्यांच्या बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली होती. आशा आहे शरद पवार यात लक्ष घालतील’ असं ट्विटर किरीट सोमय्या यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!