Share

मुंडे,ठाकरे,ओवेसींनी नव्हे तर अक्षयने चक्रीवादळग्रस्त पीडितांना केली १ कोटीची मदत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार सध्या जोरदार चर्चेत आहे. अक्षयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका देखील केली आहे.

मोदींची मुलाखत घेतल्याने अक्षयवर टीका करणारे विरोधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मात्र आता यापैकी एकाही नेत्यांनी अद्याप फनी चक्रीवादळामुळे उद्धवस्त झालेल्या पीडितांसाठी कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याची माहिती समोर येत आहे.तर दुसऱ्या बाजूला या दिग्गज नेत्यांच्या टीकेने तसूभरही विचलित न होता अक्षयने फनी चक्रीवादळामुळे उद्धवस्त झालेल्या पीडितांसाठी १ कोटींची मदत केली आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधिसाठी अक्षय कुमारने १ कोटींची मदत केली आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ट्रोल करणाऱ्या मंडळींसाठी अक्षय कुमारच्या सामाजिक कामांची छोटीशी यादी
नवी दिल्लीत एका कार्यक्रमामध्ये त्यानं शहिदांच्या कुटुंबीयांना नुकतीच १३ कोटींची मदत केली. अक्षय ‘भारत के वीर’ हे देशभक्तीपर गीत लॉन्च करण्यासाठी गेला होता तेव्हा त्याने शहीद जवानांच्या परिजनांसाठी तब्बल १२.९३ कोटी रूपयांची मदत केली. तसेच आसाममध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जवान नरपत सिंह हे शहीद झाले. त्यानंतर अक्षयनं त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना ९ लाखांची मदत केली.

शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी अक्षय कुमारच्या संकल्पनेतून नवं अॅप तयार करण्यात आलं आहे. ‘भारत के वीर’ असं या वेब पोर्टलचं नाव असून या पोर्टलच्या माध्यमातून इच्छूकांना शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येणार आहे. या पोर्टलसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबियांना ही मदत पोहचवण्यात येत आहे.

छत्तीसगडच्या सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या १२ जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारने १ कोटी ८ लाख रुपये मदत केली आहे.या हल्ल्यात सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले होते.

मुंबईतील नायगाव येथे त्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.पोलिस आणि त्यांच्या कुटुंबांना उपचाराच्या काळात राहण्यासाठी चांगली सुविधा मिळेल. पोलिस देशासाठी मोठं योगदान देतात. आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा हाच खरा मार्ग असल्याचं अक्षयचं मत आहे.

यवतमाळमधील पिंपरी बुटी गाव दत्तक घेत त्याने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला असून गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अक्षय कुमारनं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. ज्या गावांमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत, ते गाव अक्षय दत्तक घेण्याची इच्छाही त्यानं व्यक्त केली होती. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक आत्महत्या झालेलं गाव सुचवण्यास सांगितलं होतं.

अक्षयकुमारने चेन्नई पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला . पूरग्रस्तांसाठी अक्षयकुमारने एक कोटी रुपयांची मदत दिली आहे.एका ट्रस्टतर्फे चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. ट्रस्टचे प्रमुख, निर्माते जयेंद्र यांच्याकडे अक्षयने मदतीचा चेक सुपूर्द केला.

याशिवाय बीडमधल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजाराची मदत केली प्रत्येक महिन्याला १५  लाख याप्रमाणे ६ महिन्यात एकूण ९० लाखांची मदत केली .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!