मुंबई : कालपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. आयपीएलची टशन यंदा भारतात रंगली. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्समध्ये झाला. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने आपल्या खिशात घातला. सालाबाद प्रमाणे मुंबई सलामीचा सामना हरला. सलामीच्या सामन्यात दोन विकेट्स राखून विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.
आयपीएल 2021 चा हा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स गमावणार याची कल्पना आधीपासून सगळ्यांनाच होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे जिंकणे अशक्य होते. असे आम्ही नाही मुंबई इंडियन्सचा इतिहास सांगत आहे. होय आजवरचा इतिहास पहिला तर 2013 पासून दरवर्षी सलामीच्या सामन्यात मुंबईचा पराभव होत आहे.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सने मॅच विनिंग खेळी केली. विराट कोहली (33) आणि ग्लेन मॅक्सवेल (39) धावा केल्या. ही दोघे माघारी परतल्यानंतर मॅच मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकली होती. मात्र एबीने 27 चेंडूत केलेल्या 48 धावांच्या जोरावर अखेर बंगळुरुला यश मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादांच बोलणं टग्यासारखं पण रडणं बाईसारखं : गोपीचंद पडळकर
- मैदान गाजवलं : आरसीबीच्या हर्षल पटेलने मुंबईच्या निम्म्या संघाला माघारी पाठवलं !
- …तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
- आयपीएलची टशन : क्रिस लिनच्या धडाकेबाज खेळीने मुंबई इंडियन्सची स्थिती भक्कम !
- ‘गोड बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमची वाट लावली!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

