मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.
यानंतर, राज्य सरकारने महत्वाचं पाऊल उचलत सामान्य महिलांसाठी लोकलचा प्रवास सुरू करून नवरात्रोत्सवाची भेट दिली. मात्र, लोकलने प्रवास करण्याच्या वेळेची मुभा फारशी उपयोगी नसल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली होती. तर, सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासाठी ही एक प्रकारची चाचणी असल्याचे बोललले जाऊ लागले होते.
दिवाळीनंतर राज्य सरकार मुंबईकरांना दिलासा देऊ शकते अशी शक्यता होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट व वाढती रुग्णसंख्या यामुळे लोकलसेवेसाठी सामान्यांना प्रतीक्षा पाहावी लागली होती. दरम्यान, याकाळात अनेक नव्या तारखा, बैठका यांच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, नेमकी लोकल कधी सुरु होणार यावर अनिश्चितता कायम होती.
आता, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी लोकल कधी सुरु होणार यावर महत्वाचे संकेत दिले आहेत. ३१ डिसेंबरनंतर मुंबईकरांसाठी लोकल सुरु करण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले आहेत. त्यामुळे १ जानेवारीलाच लोकल रुळावर येणार का? याबाबत मात्र स्पष्टीकरण करण्यात आलं नसून मुंबईकरांना नवीन वर्षात लोकलप्रवासाचा दिलासा मिळणार असल्याच्या शक्यता बळावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना योद्ध्यांच्या लढ्यामुळेच संकटावर मात – राज्यपाल
- King Is Back : युवीचे पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन ‘या’ संघाकडून खेळण्याची शक्यता
- अशा लोकांना लाथेने तुडवलं पाहिजे; सरनाईकांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निलेश राणेंचा घणाघात
- बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 21 लाखांचा निधी देणार- अभिमन्यू पवार
- ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक


