मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणासंबंधी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रात पुतळ्याचा अनावरण सोहळा पुढच्या १५ दिवसांमध्ये करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. जर अनावरण सोहळा झाला नाही तर समस्त समाज बांधवांच्या हस्ते होळकरांचे वंशज भुषणसिंह होळकरांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण करणार असा इशारा देखील पडळकारांनी दिला आहे.
औंढा नागनाथ येथील अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं अनावरण गेल्या वर्षी १६ फेब्रुवारीलाच होणार होतं. मात्र, वर्ष उलटूनही या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं नाही. त्यामुळेच पडळकर आक्रमक झाल्याचे पाहायल मिळतय. पुढच्या १५ दिवसांमध्ये पुतळ्याचं अनावरण झालं नाही तर पुतळ्याच अनावरण करण्याचा निर्धारच पडळकर यांनी केला आहे.
‘गेल्या वर्षी १६ फेब्रुवारीलाच पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र वर्ष उलटूनही पुतळा लोकार्पणापासून वंचितच आहे. औंढा नागनाथ मंदिरांचा जिर्णोध्दार करणाऱ्या आहिल्यादेवींचाच पुतळा अजून पडद्यातच आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचं कार्य राजकारणापलीकडचं आहे. त्यात किरकोळ श्रेयवादामुळे लोकार्पण थांबवणं हा पुण्यश्लोक आहिल्यादेवींचा अपमान ठरेल. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना पुतळा अनावरण करण्यासाठी वेळ नसल्याने आजही पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून तसाच दुर्लक्षितपणे उभा आहे. ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे. असं म्हणत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत अट्टल गुन्हेगारांचे फोटोसेशन
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !
- मनपा वॉर्ड आरक्षण सुनावणीसाठी ठरणार तारीख
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- आता मिळावा फक्त एका मिस्ड कॉलवर LPG गॅस सिलेंडर !


