मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं. शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
दरम्यान, देशातील प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनी आजच्या भारत बंदला पाठींबा दिला आहे. यामध्ये आता मुंबईचा डबेवाला देखील सहभागी झाला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा कायद्यांमुळे देशातला शेतकरी संपून जाईल. उत्तर भारतात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. आज भारतबंदचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनचा या बंदला पाठिंबा आहे", असं असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं
दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन उत्पादनाच्या घोषणेने ऍपल करणार ग्राहकांना खुश ! ऍपलच्या उत्पादनाची उत्सुकता…
- विदर्भाला 200 युनिटपर्यंत वीज मोफत द्या; विदर्भवाद्यांची मागणी
- माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- ‘एकदा शेतकऱ्यांचे म्हणणे तरी ऐका…’धर्मेंद्र यांची सरकारला विनंती
- मोदी सरकार खोटारडे, अण्णा हजारेंचे राळेगण सिद्धीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू

