नागपूर : नागरिकांवर कोरोनाच्या रूपात नैसर्गिक संकट आले. उद्योग, व्यापार सर्व बंद असल्यामुळे लोकांच्या खिशात पैसे नाहीत. दुसरीकडे सरकारने तीन महिन्याचे बिल एकत्र पाठवले. इतकेच नव्हे तर १ एप्रिल २०२० पासून २१ टक्के वाढीव बिल पाठवण्यात आले. त्यामुळे सामान्य माणूस हे बिल भरू शकत नाही. जनतेवर नैसर्गिक संकट येते तेव्हा सरकार त्याच्या मदतीसाठी पुढे येते. त्यामुळे कोरोना काळातील वीज बिल सरकारनेच भरावे, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे.
कोरोना टाळेबंदीच्या काळातील वाढीव वीज बिलांचा भरणा राज्य सरकारनं करावा या मागणीसाठी काल विदर्भ राज्य समितीनं विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील सुमारे 100 ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. हे अन्यायकारक वीज बिल विदर्भातील जनता भरणार नाही, असं विदर्भ राज्य संयोजन समितीचे अध्यक्ष राम नेवले यांनी यावेळी सांगितलं.
विजेचा उत्पादन खर्च अडीच रुपये युनिट असताना महावितरण कंपनी विजग्राहकांकडून 5 रुपयापासून 16 रुपयापर्यंत प्रति युनिट वीज दर आकारून जनतेची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला. वीज तयार करताना जमीन, पाणी, कोळसा ही नैसर्गिक संपत्ती विदर्भाचीच लागते त्यामुळे प्रदूषणही विदर्भातच होतं म्हणून विदर्भाला 200 युनिटपर्यंत वीज मोफत द्या अशी मागणी नेवले यांनी यावेळी केली.आकाशवाणीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- ‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- ‘मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत,डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत’

