Share

‘एकदा शेतकऱ्यांचे म्हणणे तरी ऐका…’धर्मेंद्र यांची सरकारला विनंती

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

दरम्यान, या आंदोलनाला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे. आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून देशातील विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

नुकतेच धर्मेंद्र यांनी ट्विटरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी एक ट्विट केले होते. ‘सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढावा, देशात कोरोना प्रकरणे वाढत आहेत’, अशा आशयाचे हे ट्विट होते. मात्र, लोकांनी या ट्विटचा चुकीचा अर्थ लावून त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

या डिलीट केलेल्या ट्विटविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले, ‘मला फक्त असे म्हणायचे होते की, एकदा शेतकऱ्यांचे ऐका. मी नेहमी सकारात्मक बोलतो पण, लोक त्याचा चुकीचा अर्थ लावतात. ट्विटरवर राग व्यक्त केला जात आहे. आता मी स्वत:ला त्यापासून दूर ठेवीन. कारण यातून लोकांची दुखावत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!