Share

या काळात मुंबईचे महत्व टिकवणे गरजेचे, मुंबईसाठी वेगळे पॅकेज हवे : संजय राऊत

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांयांच्या पॅकेजचे शिवसेना खा. संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. तर मुंबईसाठी आता वेगळे पॅॅकेज जाहीर करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील श्रमिक, शेतकरी, लघु तसेच मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाचे मोठे संकट असल्याने सध्या टीका करणे योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहायला हवे.

तसेच लाखो मजुरांनी मुंबईतून स्थलांतर केले आहे. मुंबईत त्यांचे पोट भरत नसल्याने ते आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. मुंबईसारख्या शहरांचे महत्त्व टिकवणे गरजेचे आहे. मुंबईचे आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणे महत्त्वाचे असल्याने पंतप्रधानांनी वेगळे आर्थिक पॅकेज दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतून २० ते २५ टक्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा होत असतो. त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटींचं पॅकेज केले आहे. यानंतर आता कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पी एम केअर फंडातून स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटींची तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 100 कोटींची तरतूद ही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी मदत म्हणून करण्यात आली आहे. केंद्र सरकार पीएम केअर फंडमधील 2000 कोटी रुपयांत 50 हजार व्हेंटिलेटर खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे सर्व व्हेंटिलेटर भारतीय कंपन्यांनी तयार केलेले असणार आहेत. यामुळे कोरोनाच्या लढ्याला नक्कीच बळ येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली, एकूण आकडा 26 हजारच्या जवळ

भाजपकडून पंकजा मुंडे यांचे पंख छाटले जातायत, खडसेंनी केला गंभीर आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!