मुंबई : राज्यात कोरोनाने बऱ्यापैकी अनेकजणांना आपल्या कवेत घेतले आहे. मुंबई-पुणे या प्रमुख शहरांनाचं कोरोनाने लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद, मालेगाव- नाशिक, इकडे देखील दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज कोरोनाच्या तब्बल 1495 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,922 वर गेली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 30 हजार 857 नमुन्यांपैकी 2 लाख 03 हजार 439 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 25, 922 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 213 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 14 हजार 627 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 5125 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 33 पुरुष तर 21 महिला आहेत. त्यातील 29 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 21 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 54 रुग्णांपैकी 36 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपकडून पंकजा मुंडे यांचे पंख छाटले जातायत, खडसेंनी केला गंभीर आरोप
‘कोरोना’ हा मानवनिर्मित व्हायरस, नितीन गडकरींचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

