मुंबई : विधान परिषदेवर संधी दिल्याने भाजपमधील ज्येष्ठ नेते आहे चांगलेच नाराज झाले आहेत. आता तर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाकडून पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. दै. लोकमत यांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपमध्ये जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत आहेत. माझ्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित अशा बहुजन समाज व ओबीसी नेत्यांना दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच विधासाभेला डवलेल्या नाथाभाऊंना विधानपरिषदेवर संधी देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यांच्या ऐवजी पक्षाने नवीन दमाच्या नेत्यांना संधी दिली. यावर खडसे म्हणाले की, आपल्याला राज्यसभेच्या वेळी उमेदवारी देता येणार नाही, पण विधानपरिषदेच्यावेळी नक्की विचार करु असे सांगण्यात आले. मात्र ज्यांनी कायम भाजपला शिव्या दिल्या, आमच्या नेत्यांविषयी वाईट उद्गार काढले त्यांना उमेदवारी दिली गेली आणि जे पक्षात निष्ठावंत होते त्यांना डावलले गेले.
दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकुळे, पंकजा मुंडे यांची वर्णी लागेल असे म्हंटले जात होते. मात्र भाजपने ज्येष्ठांना घरी बसवून नवीन दमाच्या उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपने गोपीचंद पडळकर, रणजितसिंग मोहिते पाटील, प्रवीण दटके, अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. यावरून एकनाथ खडसे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाच्या काळात उद्योगांचे मोठे नुकसान, तीच भरपाई करण्यासाठी केंद्राचे मोठे पॅकेज : जावडेकर
तुळजापुरात होतेय चोरीचोरी छुप्या पध्दतीने दारु-तंबाखू विक्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

