Share

आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून मुंबई महापालिका राबविणार ‘टॉयलेट ऑन व्हिल’ उपक्रम

Published On: 

मुंबई : मुंबईत द्रुतगती महामार्ग आणि मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था नसल्यामुळे प्रवासी, नागरिक आणि बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. आता हीच गैरसोय टाळण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिका ‘टॉयलेट ऑन व्हिल’ हा स्तुत्य उपक्रम राबविणार आहे.

मुंबईत प्रमुख मार्गांवर पालिकेच्या माध्यमातून ‘टॉयलेट ऑन व्हिल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘झोन-7’ मध्ये कांदिवली, बोरिवली आणि दहिसर विभागात महापौर किशोरी पेडणेकर यांनी या उपक्रमाचा आढावा घेऊन दहा जागा निश्चित केल्या आहेत.

आर/ दक्षिण विभागातील पश्चिम द्रुतगती महामार्ग, गंगानगर, कांदिवली (पूर्व), आर/ मध्य विभागातील पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवली ( पूर्व) येथील पेट्रोल पंपच्या बाजूला, सुधीर फडके पुलाच्या बाजूला, आर उत्तर विभागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोरील द्रुतगती महामार्गाच्या पुलाच्या खाली, आदिनाथ टॉवर, राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सर्विस रोड या जागांची पाहणी करण्यात आली आहे.

गाड्यांच्या स्वरूपात असणाऱ्या या स्वच्छतागृहांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी व्यवस्था असेल. वापरकर्त्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवाय संबंधित ठिकाणी स्वच्छता राहण्यासाठी विशेष खबरदारी देखील घेण्यात येणार आहे. शिवाय शौचालयातील मलजलावर केमिकलच्या माध्यमातून प्रक्रिया करूनच सांडपाण्यात सोडले जाणार असल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!