Share

लोकल प्रवाशांसाठी मुंबई महापालिका सज्ज ; ६५ रेल्वे स्थानकांवर मिळणार ओळखपत्र

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. मुंबईकरांची लाईफलाईन असणारी मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातही ज्यांनी लस घेवून १५ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना हा प्रवास करता येणार आहे. यासाठी एक अॅप देखील असणार आहे त्यावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात देखील हा पास मिळणार आहे.

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याकरिता ओळखपत्र देण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. त्यानंतर महापालिकेच्या विभाग कार्यालयांबरोबरच ६५ रेल्वे स्थानकांवर हे ओळखपत्र दिले जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने क्युआर कोडचे ओळखपत्र संबंधित प्रवाशांना मिळेल अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी सांगितले.

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी समन्वय सुरु असून ओळखपत्र देण्यासाठी येत्या दोन दिवसांत हे ॲप तयार होणार आहे. या ॲपवरून क्युआर कोड मिळाल्यानंतर प्रवाशांना लोकलचे तिकीट अथवा पास मिळणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारची टास्क फोर्स, पालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वय असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!