🕒 1 min read
औरंगाबाद : यंदा ऑगस्ट उजाडला तरीही पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा त्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील नदी नाले कोरडेठाक पडले आहेत. तर धरण आणि विहिरींची पाणी पातळी खालावत चालली आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला परंतु आत्तापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे रिमझिम पावसावर पिके तग धरून हिरवीगार दिसत असली तरी अद्याप पाणीपातळीत वाढ झालेली नाही. भविष्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाअभावी उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावर्षी तालुकभरात सुरुवातीला वेळेवर पावसाचे आगमन होते. त्यामुळे शेतकर्यांना मृग नक्षत्राचा पेरणी मुहूर्त साधता आला होता. त्यानुसार शेतकर्यांनी आपल्या पेरण्या उरकून घेतल्या होत्या, परंतु त्यानंतर मध्येच पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील बर्याच शेतकर्यांना दुबार पेरणी संकटाचा सामना करावा लागला होता. कशीबशी रिमझिम पावसावर आतापर्यंत पीके तग धरून आहेत. परंतु आज ही शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
सुरुवातीला झालेल्या एक दोन पावसानंतर गेल्या दोन महिन्यात एकही दमदार पाऊस न झाल्यामुळे छोट्या-मोठ्या नद्या-नाले खळाळलेच नाहीत. त्यामुळे भूगर्भातीले पाणी पातळीत वाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस घट होऊन विहिरीनी तळ गाठला आहे. तर पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे यासह छोटी मोठी धरणे, नाले कोरडीठाक पडली आहेत. दरम्यान, आजही जिल्ह्यातील काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी दरवर्षी ओव्हरफ्लो होणाऱ्या धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काळात समाधानकारक पाऊस पडला नाही तर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र पेटवायला मला केवळ दोन मिनिटे लागतील…’- खासदार संभाजीराजे
- ‘ओ सरकार आता बास झालं…’; पुरबाधित शिये गावच्या गावकऱ्यांची पंचगंगेत उडी
- ‘जनआर्शिवाद’ यात्रेसाठी निघालेल्या डॉ. भागवत कराडांना बीड जिल्ह्यामध्ये ‘नो एन्ट्री’?
- ‘या’ कारणासाठी घेतली अभिमन्यू पवारांनी गडकरींची भेट
- महाराष्ट्रात सिने स्टाईल अमली पदार्थांची तस्करी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
